घरमनोरंजनरणवीर आणि आलिया आता 'रालिया'

रणवीर आणि आलिया आता ‘रालिया’

Subscribe

रणबीर आणि आलिया भट्ट सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. तर आलियाच्या चाहत्यांना या जोडीला नाव दिलं आहे 'रालिया'.

बॉलिवूड असो वा क्रिकेटजग यामधील जोड्यांचं नाव एकत्र करण्याचा एक ट्रेंडच झाला आहे. यापूर्वी ‘सैफिना’, ‘दीपवीर’, ‘विरुष्का’ या जोड्या त्यांच्या चाहत्यांनी बनवल्याच आहेत. तर बॉलीवूडची नवी जोडी आहे ‘रालिया’. तुम्ही म्हणाल आता हे कोण? तर नुकतेच नव्यानं प्रेमात असलेले रणबीर कपूर आणि आलिया भटच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी ‘रालिया’ असं नाव दिलं आहे. सोशल मीडियावर ‘रालिया’ नावानं ही जोडी ओळखली जाऊ लागली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या नात्यावर आधीच त्यांच्या चाहत्यांनी मोहोर लावली आहे. यावर आलियानं अजूनही आपलं मौन सोडलेलं नाही. मात्र रणबीर कपूरनं काही दिवसापूर्वीच एका मुलाखतीमध्ये आपण आलियाला डेट करत असल्याचं मान्य केलं आहे.

‘दिल है के मानता नहीं’

रणबीर कपूर आणि आलियानं ‘ब्रम्हास्त्र’चं चित्रीकरण सुरु केल्यापासूनच त्यांच्या प्रेमाच्या चर्चेला सुरुवात झाली. मात्र त्यावर दोघांनीही काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला. पण रणबीरची सध्या ‘दिल है के मानता नहीं’ अशी स्थिती झाली असावी. ‘संजू’ चित्रपटाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा रणबीर मीडियासमोर आला आहे. तेव्हा तेव्हा त्यानं आलियाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. थोड्याच दिवसापूर्वी ‘प्रेमात असणं ही खूपच छान भावना आहे. हा एक आनंददायी असा अनुभव आहे. प्रेमात प्रत्येक गोष्ट चांगलीच वाटत असून पाणीदेखील सरबतासारखं लागतं’ अशी भावना रणबीरनं व्यक्त केली होती. रणबीरच्या या वक्तव्यामुळं तो लवकरच लग्नबंधनात अडकेल अशी चर्चा आहे. एका चाहत्यानं ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारला असता ‘आशा आहे, लवकरच.’ असं उत्तर रणबीरनं दिलं होतं.

- Advertisement -

आलिया – रणबीरच्या प्रेमाला घरची परवानगी

आलिया आणि रणबीरच्या प्रेमाला कपूर खानदानाकडून होकार मिळाला आहे असं सध्या चित्र आहे. आलियाच्या २५ व्या वाढदिवसाला नीतू कपूर बल्गेरियाला पोचली होती. तर काही दिवसापूर्वीच रणबीरबरोबर फॅमिली डिनरमध्ये आलिया दिसली होती. तर रणबीरची बहीण रिद्धिमानं आलियाला ब्रेसलेट गिफ्ट दिल्याचीदेखील बातमी होती. शिवाय काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत आपण ३० वर्षांपूर्वीच लग्न करू शकतो असं वक्तव्य आलियानं केलं होतं. त्यामुळं आता हे नातं लवकरच नक्की कोणतं वळण घेणार हे पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -