रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र?

रणबीर-दीपिका या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याची शक्यता आहे.

Mumbai
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. बचना ए हसीनो, ये जवानी है दिवानी, तमाशा या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. या दोघांचे सगळेच चित्रपट हिट ठरले. या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा बघण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याची शक्यता आहे. लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात या दोघांना साईन केलं आहे.

दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरी या चित्रपटासाठी दीपिकाची निवड करण्यात आल्याचं सूत्रांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. दीपिका आणि रणबीर लव रंजन यांच्या ऑफिसमधून एकत्र बाहेर पडले आणि या बतामीवर शिक्कामोर्तब झालं. रणबीर आणि दीपिका काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच ब्रेकअप झाल्यानंतर देखील त्यांनी एकत्र चित्रपट केले. आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र काम करणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच. या चित्रपटात अजय देवगणही काम करणार असून तो रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारेल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

दीपिकावर चाहते नाराज

अनेक चाहत्यांनी दीपिकाला लव रंजन यांचा चित्रपट न करण्याची विनंती केली. इतकेच नाही तर अनेकांनी लव रंजनचा चित्रपट साईन केल्यास तू हजारो चाहते गमावून बसशील, असेही लिहिले. ही बातमी येताच, दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला. मीटू मोहिमेअंतर्गत एका अभिनेत्रीने लव रंजन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केला होता. २०१० मध्ये एका चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान लव रंजन यांनी मी ब्रा आणि पॅन्टीमध्ये कशी दिसते, हे पाहण्यासाठी कपडे उतरवण्यास सांगितले होते, असा आरोप या अभिनेत्रीने केला होता. यामुळे दीपिकाने त्यांचा चित्रपट करू नये अशी चाहत्यांची इच्छा आहे.