…तर रणबीर कपूर असता ‘गली बॉय’

चित्रपटातील भूमिकेवरुन रणबीर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यामुळे रणबीरने 'गली बॉय' चित्रपटात काम करण्यासाठी साफ नकार दिला.

Mumbai
Ranbir kapoor was 1st choice for gully boy
सौजन्य - हॉटस्टार/फेसबुक
सध्या बी-टाऊन आणि रणवीर-आलियाच्या फॅन्सना उत्सुकता लागून राहिली आहे ती ‘गली बॉय’ या आगामी चित्रपटाची. आलिया आणि रणवीरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, जगभरातील चाहते ट्रेलरचं आणि सोबतच आलिया, रणवीरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. मात्र, या चित्रपटाविषयीचा एक नवा पैलू नुकताच समोर आला आहे. गली बॉय चित्रपटाची पहिली निवड रणवीर सिंग नसून रणबीर कपूर होता, त्यालाच सर्वात आधी ‘गली बॉय’ साकारण्याची ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. रणवीर सिंगची निवड करण्याआधी आलियाच्या अपोझिट काम करण्यासाठी तिचा कथित बॉयफ्रेंड रणबीर कपूरला ‘गली बॉय’च्या रोलसाठी विचारणा केली होती. मात्र, सूत्रांनुसार चित्रपटातील भूमिकेवरुन रणबीर आणि दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यामुळे रणबीरने ‘गली बॉय’ चित्रपटात काम करण्यासाठी साफ नकार दिला. रणवीर सिंगनेच एका कार्यक्रमामध्ये याविषयीचा खुलासा केला. त्याचसोबत रणबीर कपूरमुळे ही भूमिका माझ्या नशिबी आल्याचं म्हणत, रणवीरने मिश्कीलपणे त्याचे आभारही मानले.


वाचा : रणवीरसाठी दीपिका ठरली ‘लकी चार्म’

रणवीर सिंगचा ‘गली बॉय’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्टही प्रमुख भूमिकेत आहे. तर दुसरीकडे मराठमोठी अभिनेत्री अमृता सुभाष ‘गली बॉय’ चित्रपटात झळकणार आहे. अमृता सुभाष या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बॉलीवूडचा आघाडीचा हिरो असलेल्या रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत अमृता सुभाषला पाहणं, ही प्रेक्षकांसाठीही वेगळी बाब ठरणार आहे. ‘दिल धडकने दो’ चित्रपटानंतर झोया अख्तर आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. तर आलिया आणि रणवीर यानिमित्तामे प्रथमच एकत्र काम करत आहेत. तर आलिया आणि रणवीर यानिमित्ताने प्रथमच एकत्र सिल्व्हर स्क्रीन शेअर करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here