Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नववर्षात चॉकलेट बॉयचे चाहत्यांना सरप्राईज

नववर्षात चॉकलेट बॉयचे चाहत्यांना सरप्राईज

टी सीरिजने व्हीडिओ शेअर करत केली 'Animal' चित्रपटाची घोषणा

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन वर्षापासून बिग स्क्रिनपासून दूर असलेला बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ रणबीर कपूर नववर्षात चाहत्यांसाठी नवा कोरा सिनेमा घेऊन सज्ज झाला आहे. २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या ‘संजू’ चित्रपटाच्या यशानंतर रणबीरचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आता २०२१ नववर्षात रणबीर कपूरने ‘Animal’ चित्रपटाची घोषणा करत बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार एंट्री घेतली आहे.

नववर्षाच्यानिमित्त रणबीर कपूर, गलफ्रेंड अलिया भट्ट आणि कपूर फॅमिली सध्या राजस्थानच्या रणथंभोरमध्ये सेलिब्रेशन करत आहेत. याचवेळी रणबीरने आपल्या आगामी ‘एनिमल’ चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. नववर्षाच्या स्वागतासह टी-सीरिजने ऑफिशियल ट्विटरवर रणबीरच्या आगामी ‘Animal’ चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. टी-सीरिजने ‘वर्षाची सुरुवात शिट्टी मारून झाली पाहिजे. पेश करत आहे ‘Animal’ स्टरिंग रणबीर कपूर. चला मज्जा करा.’ असे कॅप्शन देत १ मिनिट १८ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये रणबीरच्या आवाजातील संवाद ऐकू येत असून ‘पापा पुढच्या आयुष्यात तुम्हाला माझा मुलगा व्हायचं आहे, मग मी तुमच्यावर प्रेम कसे करतो हे पाहा. मग तुम्ही हे शिका कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मीच तुमचा मुलगा आणि तुम्हीच माझे वडील असाल.’ असे म्हणत आहे.

- Advertisement -

या संवादावरून अंदाज येऊ शकतो की, सिनेमामध्ये वडील आणि मुलाची इमोशनल ड्रामा पाहता मिळणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसह अनिल कपूर, बॉबी देओल, परिणीती चोप्रा अशी बडी स्टारकास्ट झळकणार असून ‘कबीर सिंग’ चित्रपटाचे डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा हा चित्रपट डायरेक्टर करणार आहेत. चित्रपटाचे ‘Animal’ हे टायटल का ठेवण्यात आले आहे, याबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. अनिल कपूर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर शेअर करत म्हणाले की ‘हा प्रवास सुरू करण्यासाठी मी अजून प्रतीक्षा करू शकत नाही.’

- Advertisement -