घरमनोरंजनRanbir Kapoor Birthday : रणबीरला मिळाले बहिण रिद्धिमाकडून हे खास गिफ्ट

Ranbir Kapoor Birthday : रणबीरला मिळाले बहिण रिद्धिमाकडून हे खास गिफ्ट

Subscribe

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आज, २८ सप्टेंबर रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रणबीर सोशल मीडियावर इतका अॅक्टिव्ह नसला तरी त्याची बहिण रिद्धिमा सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करताना दिसते. आजही रणबीरच्या वाढदिवसानिमित्त रिद्धिमाने त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत रणबीर खास शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमाने त्यांचे काही कौटुंबिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूरदेखील दिसत आहेत. सोबत रिद्धिमाने कॅप्शन दिली आहे की, हॅपियस्ट बर्थडे ऑसमनेस. माझं तुझावर खुप प्रेम आहे.

- Advertisement -

हिंदी सिनेसृष्टीतील कपूर खानदान गेल्या ७० दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला अभिनयाचा वारसा पुढे त्यांच्या वंशजांनी सुरू ठेवला. रणबीर कपूर ही या परिवारातील चौथी पिढी या कला क्षेत्रात कार्यरत आहे. घरातच अभिनय आणि सौंदर्याचा वारसा मिळालेल्या रणबीरनेदेखील आज अनेक हिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये रॉकस्टार, संजू, राजनिती, बर्फी, अजब प्रेम की गजब कहानी सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा –

CORONA योद्ध्यांना महापालिकेने मध्यरात्री काढले हॉटेल बाहेर; MNS च्या दणक्याने मिळाला न्याय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -