रणदीप भागवतोय दुष्काळग्रस्तांची तहान

नाशिक जिल्ह्यातील वेले गावातील दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्याचे काम अभिनेता रणदीप हुडा करत आहे.

Mumbai
Randeep helping people in Nashik
नाशिकमधील दुष्काळग्रस्तांची मदत करताना अभिनेता रणदीप हुडा

सध्या भारतातील ४२ टक्के भाग दुष्काळाचा सामना करत आहे. देशातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रालाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना बॉलिवूडचा प्रभावि अभिनेता रणदीप हुडाही स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांची तहान भागवत आहे.

अभिनेता रणदीप हुडा एका सामाजिक संस्थेच्या मदतीने नाशिक जवळील एका गावात दुष्काळग्रस्तांची मदत करत आहे. ब्रिटनमधील खालसा एड्स या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेबरोबर मिळून अभिनेता रणदीप हुडा नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त वेले गावातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहे.
रणदीप हुडाने नुकताच याबाबतचा व्हिडोओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता रणदीप दुष्काळग्रस्तांना समाधान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा दिसत आहे.

दुष्काळग्रस्तांची मदत करण्याचे सरकारला आवाहन

या व्हिडीओद्वारे रणदीप या प्रकल्पाची माहिती देत आहे. मी नाशिकमधील वेले या गावी आहे. येथील विहिरी सुकल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळा येथील गंभीर समस्या असून हे क्षेत्र दुष्काळग्रस्त भागात येते. रणदीप पुढे म्हणतो की, खालसा एडची टीम याठिकाणी पोहचली आहे. दररोज २५ ते ३० पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून स्वयंसेवक उत्तम कार्य करत आहेत. या व्हिडीओद्वारे रणदीपने सरकारला विनंती केली आहे. त्याने सरकारला आग्रह करून या संस्थेच्या कामाची दखल घेवून दुष्काळ निवारणाच्याकामी या लोकांची मदत करण्याची विनंती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here