घरमनोरंजन‘मर्दानी’ राणी पुन्हा परतणार!

‘मर्दानी’ राणी पुन्हा परतणार!

Subscribe

राणी मुखर्जीच्या सुपरहिट 'मर्दानी' या चित्रपटानंतर मर्दानीचा सिक्वल लवकरच येणार आहे.

राणी मुखर्जीच्या सुपरहिट ‘मर्दानी’ या चित्रपटानंतर राणी पुन्हा एकदा ‘मर्दानी २’ मध्ये परतणार आहे. २०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात राणीने मर्दानी पोलीसाची भूमिका साकारली होती. ही राणीची भूमिका सर्वांना खूपच आवडली होती. राणीने ‘नो वन किल जेसिका’, मर्दानी, हिचकी अशा दमदार कथानकाच्या जोरोवर तिनं अभिनेत्याविनाच हे चित्रपट सुपरहिट करुन दाखवले आहेत. राणीच्या ‘हिचकी’ नं तर बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली होती. आता गाजलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सिक्वलदेखील चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

मर्दानी चित्रपट

मर्दानी या चित्रपटात राणीने पोलिसाची केलेली भूमिका सर्वच प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटात लहान मुलांचं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या गँगचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणींन सगळ्याच प्रेक्षकांच्या प्रशंसा मिळवल्या होत्या. आतापर्यंत रोमँटिक भूमिका साकारणारी राणीची ही मर्दानी ही भूमिका देखील तिच्या चाहत्यांना आवडली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक करण्यात आलं.

- Advertisement -

मर्दानी २ लवकरच येणार

मर्दानी या चित्रपटाचा सिक्वल येत्या २०१९ च्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मर्दानीचा सिक्वल आणण्याचा विचार यशराज फिल्मनं केला आहे. बॉलिवूडच्या हंगामाच्या माहितीनुसार पुढील वर्षात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे.


वाचा – राणीच्या घराबाहेर अरमान कोहलीने केली लघुशंका

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -