हिमेश रेशमियानंतर ‘या’ अभिनेत्रीला रानू मंडलसोबत करायचंय काम!

राखी सावंतने सोशल मीडियावर स्टार झालेल्या रानू मंडलला दिली ऑफर

Mumbai
रानू मंडल

सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेली रानू मंडल आता सर्वत्रच प्रसिद्ध झाली आहे. तिला वेगळी अशी ओळखदेखील तिच्य़ा रेल्वे स्थानकातील गाण्याने मिळाली आहे. नुकतेच संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियासोबत ‘हॅपी हार्डी और हीर’ साठी ३ गाणे देखील गायले आहे. यादरम्यान, अभिनेत्री राखी सावंतचा एक छप्पन छुरी या गाण्याचा व्हिडिओ काही दिवसांपुर्वी रिलीज झाले आहे. या गाण्याच्या प्रमोशन आणि प्रसिद्धीच्य़ा कामाला लागली आहे. तसेच राखीची अशी इच्छा आहे की, रानू मंडलने तिच्या या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आपल्या आवाजात गावे. रानू मंडलच्या मधुर आवाजाने राखी प्रभावित झाली आणि राखीवर चित्रित झालेल्या गाण्याला रानूने आपल्या आवाजात गाण्याची ऑफर दिली.

राखीवर चित्रीत झालेले या मुळ गाण्याला मंदाकिनी बोरा यांनी गायले आहे. या राखीच्या व्हिडिओमध्ये राखी शिवाय मयुराक्षी बोरा आणि मोनिका सिंह हे देखील आहेत.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका


हिमेश रेशमियाच्या सांगण्यावरून रानूने तीन गाणे गायले आहे. यामध्ये ‘तेरी मेरी कहानी’, ‘आदत’ आणि ‘आशिकी में तेरी’ हे गाणे तिने गायले आहे. या तिच्या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. रानू मंडलचे हे टॅलेंट पाहून रानूचे अनेक चाहते देखील निर्माण झाले आहे. रानूच्या या टॅलेंटचे कौतुक स्वतःहा लता मंगेशकर यांनी देखील केले होते. परंतु, लता मंगेशकर यांनी ही गोष्ट रानूसोबत इतर गायकांना देखील सांगितली होती. मात्र, लता मंगेशकर यांचा हा सल्ल्याने रानू मंडलच्या चाहत्यांना नाराज केले आहे.