घरमनोरंजनVideo : ज्या गाण्याने ओळख दिली तेच गाणं राणू विसरली!

Video : ज्या गाण्याने ओळख दिली तेच गाणं राणू विसरली!

Subscribe

सोशलमिडीयावर रातोरात स्टार झालेली राणू मंडलचे आता स्वत:चा चाहतावर्ग तयार झाला आहे. राणूला गायक हिमेश रेशमियाने बॉलिवूडच्या चित्रपटात गाण्याची संधीही दिली. ‘ये प्यार का नगमा है’ हे राणूचं गाणं चाहत्यांच्या तर तोंडपाठ आहे. पण हेच गाणं राणू मात्र विसरली आहे.

- Advertisement -

राणू सध्या अनेक कार्यक्रमात हजेरी लावत आहे. अलिकडेच राणूने एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त करत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना हिमेश रेशमीया बरोबर गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली गेली. परंतु हातात माईक घेताच त्या गाणे विसरल्या. या घटनेतील आवाक् करणारी बाब म्हणजे रानू मंडल यांना ‘तेरी मेरी’ या गाण्यामुळेच प्रसिद्धी मिळाली होती. याच गाण्याने त्यांना रातोरात सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिले होते. आणि त्याच गाण्याच्या ओळी त्यांना आठवेनासे झाले.

- Advertisement -

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परंतु हा प्रसंग कुठल्या कार्यक्रमात घडला याची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. याआधी रानू मंडल एका रिअॅलिटी शोमध्ये मल्याळम भाषेत गायलेल्या गाण्यामुळे चर्चेत होत्या. या कार्यक्रमात त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर एक मल्याळम गाणे गायले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -