घरट्रेंडिंगनेटकऱ्यांनी रानूच्या वागणुकीवर शेअर केले भन्नाट मीम्स!

नेटकऱ्यांनी रानूच्या वागणुकीवर शेअर केले भन्नाट मीम्स!

Subscribe

आता नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून रानूच्या 'मला स्पर्श करु नये' या वक्तव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली उडवली आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे एका रात्री स्टार झालेल्या रानू मंडलला आता तिच्या चाहत्यासोबतच्या वागणुकीमुळे नेटकऱ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. स्पर्श करुन सेल्फीसाठी विनंती करणाऱ्या चाहतीला रानूने खडे बोल सुनावले. त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून रानूच्या ‘मला स्पर्श करु नये’ या वक्तव्याची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

काय म्हणातायत मीम्स?

रानूने तिच्या चाहतीला दिलेल्या वागणुकीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर आता काहीजणांनी मीम्सच्या माध्यमातून रानूला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रानूची तुलना लाजाळू या वनस्पतीशी त्याचबरोबर विजेच्या तारा आणि कबीर सिंहची हिरोईन प्रीति हिच्यासोबत रानूच्या वक्तव्याची तुलना करत नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

- Advertisement -

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

सध्या रानूचा एक व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते तिच्यावर टिका करत आहेत. एका सुपरमार्केमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या रानू मंडल यांच्याकडे तेथील एका महिला चाहतीने सेल्फीसाठी विचारणा केली. यावेळी महिला चाहतीने रानू मंडल यांच्या हाताला स्पर्श करत रानूकडे सेल्फीसाठी विनंती करताना दिसते. तिच्या या वागण्याचा राग येऊन रानू मंडल तिच्यावर रागवल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. तुम्ही अशाप्रकारे माझा हात का पकडला, म्हणून रानूने त्या महिलेला राग भरला. यावर ती महिला चाहती रानूकडे केवळ हसत पाहत राहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -