घरमनोरंजनआईला भेटू देत नव्हते; रानू मंडलच्या मुलीचा दावा

आईला भेटू देत नव्हते; रानू मंडलच्या मुलीचा दावा

Subscribe

१० वर्षापुर्वी आईला का सोडले, रानू मंडलच्या मुलीने केला खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडोच्या माध्यमातून रोतोरात झालेली स्टार रानू मंडल यांची मुलगी १० वर्षापुर्वी सोडून गेली होती. रानू प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची मुलगी एलिजाबेथ रॉय त्यांना भेटण्यास पोहचली. यानंतर तिला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. एलिजाबेथ रॉय ट्रोल झाल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया देऊन खुलासा केला आहे. रानू मंडल यांना एकटं सोडण्यामागचे कारण रानू मंडल यांच्या मुलीने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एलिजाबेथने सांगितले की, तिला अनेकदा रानू मंडल यांना सोडून जाण्याच्या धमक्या येत होत्या. यामुळे त्यांनी आपल्या आईला सोडून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाच्या धमक्या येत होत्या, याचा खुलासा त्यांनी केला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – रानू मंडलने गायलं तिसर गाणं; अनोखा अंदाज बघून व्हाल थक्क!


‘माझी आई रेल्वे स्थानकावर गाणी गाते हे मला माहित नव्हते. मी जेव्हा कलकत्त्याला गेली होती त्यावेळी मी माझ्या आईला एका बस स्थानकावर गाताना पाहिले होते. त्यावेळी मला धक्का बसला आणि मी आई जवळ जाऊन २०० रूपये देऊन घरी जाण्यास सांगितले होते.’ असे एलिजाबेथने सांगितले होते.

- Advertisement -

तसेच, ट्रोल झाल्यावर एलिजाबेथने सांगितले की, ‘माझ्या आईला चार मुलं आहेत त्यापैकी मीच आईची देखरेख करत होते. मी माझ्या आईला काकांच्या खात्यावर पैशे पाठवत असायची, मात्र, माझा घटस्फोट झाला आणि त्यानंतर मी किराना मालाचे लहानसं दुकान चालवते. य़ासह मी ४ वर्षाचा माझ्या मुलाचा सांभाळ करते. मी अनेकदा प्रयत्न केला की माझी आई माझ्यासोबत रहावी, मात्र तिने नकार दिला. परंतु आता लोकं माझ्यावर वेगवेगळे आरोप लावत आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -