घरमनोरंजनVideo: रानू मंडलचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Video: रानू मंडलचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Subscribe

रानू मंडल आता पुन्हा एकदा या कारणांमुळे व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर रातोरात सुपरस्टार झालेली रानू मंडलचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रानूला तिच्या चाहतीने सेल्फीसाठी हाताला स्पर्श केला. म्हणून रानूने तिला रागात येऊन फटकारले होते. यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर जेव्हा माध्यमांनी रानू मंडला प्रश्न विचारला तेव्हा तिने या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नव्हते. आता पुन्हा एकदा रानू मंडलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रानू सलमान खानच्या चित्रपटातील गाणं गाताना दिसत आहे.

- Advertisement -

रानू मंडलचा हा व्हिडिओ मीम फॅक्टरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल सलमान खानच्या सुपहिट चित्रपटातील ‘दीवाना है ये मन’ हे गाणं गाताना दिसत आहे. रानू मंडलचा हा व्हिडिओ जरी जुना असला तरी तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

रेल्वे स्टेशनवर गाणे गाणारी रानू मंडल ही रातोरात सुपरस्टार झाली आहे. त्यानंतर तिला हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी अँड हीर’ या चित्रपटातील ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं गाण्याची संधी मिळाली होती. तिने हिमेश रेशमियासोबत एक नव्हे तर तीन गाणी गायली आहेत. ‘तेरी मेरी कहानी’, ‘सवय’ आणि ‘आशिकी मी तेरी’ ही तीन गाणी रानू मंडलने गायली आहेत.


हेही वाचा – लता मंगेशकर रुग्णालयात दाखल


 

एक प्रतिक्रिया

  1. आवाज के साथ दिल और विचार भी अच्छे होना जरूरी है आवाज की धनी है पर दिल और विचार से भिखारी ही है

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -