रानूच्या मुलीचा आवाज तुम्ही ऐकला का?; माय-लेकींचा व्हिडिओ व्हायरल

रानू मंडलला तिची मुलगी एलिजाबेथ १० वर्षानंतर भेटली असून त्य़ांचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Mumbai

सोशल मीडियावर सध्या एकाच व्यक्तीची चर्चा दिसतेय. एका रात्रीमध्ये संपुर्ण आयुष्य बदलून गेलं ती रानू मंडल आता स्टार झाली आहे. सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेल्या रानूचे एकामागून एक व्हिडिओ समोर येत आहे. सध्या रानू मंडलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रानू एकट्या गात नसून त्यांची मुलगी देखील त्याच्या सोबत गातांना दिसत आहे. वायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रानू मंडल आणि एलिजाबेथ आपल्या आईसोबत सूरेल आवाजात गाताना दिसत आहे.

एलिजाबेथ आपल्या आईसोबत सूरात सूर मिसळल्याचा प्रयत्न करत असून दोघीपण प्रसिद्ध बॉलिवूडचे गाणं ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ हे गाण गातांना दिसत आहे. हे गाणं गाताना दोघींमध्ये असणारी बाँडींग या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.


हेही वाचा- आईला भेटू देत नव्हते; रानू मंडलच्या मुलीचा दावा


हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपुर्वी पोस्ट केला होता मात्र, आता हा रानू आणि त्यांची मुलगी एकत्र गातानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.