उद्या रानू मंडलचं ‘हे’ गाणं होणार रिलीज

Mumbai
Ranu Mondal's song Teri Meri Kahaani to release tomorrow. Seen the trailer yet?
उद्या रानू मंडलचं 'हे' गाणं होणार रिलीज

सोशल मीडियावर कधी काय होईल हे सांगू शकतं नाही. असंच घडलं आहे हे रानू मंडल हिच्यासोबत. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली रानू मंडल हीने ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं गायलं आहे. ‘हॅपी हार्डी अँड हीर’ हा हिमेश रेशमियाचा आगामी चित्रपटातील ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं रेकोर्ड झालं असून लवकरच हे गाणं रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर रानू मंडलच सध्या जोरदार असं वादळ सुरू आहे. पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावरील रानूचा ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे रानू रातोरात स्टार झाली. नुकतंच ‘तेरी मेरी कहाणी’ या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये हा देखील रानूच्या गाण्याचा टीझर हिट झाला आहे. सतत रानूच्या गाण्याचा व्हिडिओ नेटकरी शेअर करत असल्यामुळे ती अधिकाधिका लोकांपर्यंत पोहचत आहे.

हेही वाचारानूच्या मुलीचा आवाज तुम्ही ऐकला का?; माय-लेकींचा व्हिडिओ व्हायरल

‘हॅपी हार्डी अँड हीर’ या चित्रपटाचे निर्माते दीपशिखा देशमुख आणि सबिता माणकचंद यांनी या चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज होण्याआधी चित्रपटाची सर्व गाणी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिमेश असा म्हणाला की, ‘हॅपी हार्डी अँड हीर’ या चित्रपटला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे मी खूप आनंदी आहे. तसंच रानूजीनी अत्यंत सुंदर गाणं गायलं आणि माझ्या मते प्रेक्षक या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद देतील, असं हिमेश रेशमियाने सांगितलं आहे. या चित्रपटच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच चित्रपटाच्या ट्रेलरद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.