रणवीर – दीपिका इटलीसाठी रवाना

बॉलीवूडमधील भावी जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी दोघेही इटलीला रवाना झाले आहेत.

Mumbai
Deepika Padukone, Ranveer singh leave for their wedding in Italy
फाईल फोटो

बॉलीवूडमधील भावी जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी दोघेही इटलीला रवाना झाले आहेत. एमिरेट्सच्या ईके ५०१ क्रमांकाच्या विमानाने रणवीर – दीपिका दुबईमार्गे इटलीला निघाले. शुक्रवार, ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते दोघे त्यांच्या कुटुंबियांसोबत लग्नासाठी निघाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

वाचा : रणवीर सिंगच्या ‘हळदी’चे फोटो व्हायरल

वाचा : लग्नासाठी रणवीरने केला शेफसोबत करार

इटलीत लग्न, बंगळुरुत रिसेप्शन 

पुढील आठवड्यात १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान इटलीतील लेक कोमोमध्ये रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर बंगळुरु येथे २३ नोव्हेंबर रोजी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. बॉलीवूडची सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी दीपिका आणि रणवीर या महिन्याच्या १४-१५ तारखेला लग्नबंधानात अडकणार आहेत. इंडस्ट्रीतले हे दोन लव्हबर्ड्स गेल्या ४ ते ५ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. याकाळात त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. काधी या दोघांनी अफेअरच्या बातम्यांचं खंडन केलं होतं, तर कधी मजा-मस्करीत या गोष्टीची कबुलीसुद्धा दिली होती. आता रणवीर आणि दीपिकाचं ग्रँड वेडिंग कसं रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपिका आणि रणवीरने आतापर्यंत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा ऑनस्क्रीन कधी दिसणार याबाबतही चाहते उत्सुक आहेत.

वाचा : रणवीर – दीपिकाच्या लग्नाची तारीख १५ नोव्हेंबरच का?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here