घरट्रेंडिंगरणवीर राहणार दीपिकाच्या घरी

रणवीर राहणार दीपिकाच्या घरी

Subscribe

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन तिच्या प्रभादेवी येथील घरी राहणार आहेत. त्यांचा ५० कोटींचा बंगला तयार झाल्यावर ते तिथे जातील.

नुकतेच विवाहीत झालेले रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण काल इटलीहून मुंबईला परतले. विमानतळावरच फॅन्सने आणि मीडियाने त्यांना घेरले आणि त्यांच्या अवती-भवती घोळका केला. दोघांनीही आपल्या कारमधून परतन्याआधी मीडियासाठी पोज केलं आणि एकदम हसून नमस्कार केला. इटलीत लेक कोमो येथे १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी त्यांचा कोंकणी आणि सिंधी पध्दतीने विवाह सोहळा पार पडला. दोघांनीही प्रत्येक सोहळ्यातील एक फोटो, असे एकूण दोन फोटोज सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्स सोबत शेअर केले.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


मुंबईत परतल्यावर दोघेही थेट रणवीर सिंगच्या घरी गेले. तेथे भावनानी परिवाराने दीपिकाचे मोठ्या थाटात स्वागत केले. सिंधी पध्दतीने दीपिकाचे गृह प्रवेश करण्यात आले. आरती आणि काही पारंपरिक पध्दतीचे खेळ याने त्यांनी त्यांच्या सुनेचे स्वागत केले. काल दिपिका रणवीरच्या घरी राहिली. पण आज ते दोघेही दिपिकाच्या मुंबईतील प्रभादेवी इधल्या घरी राहायला जाणार आहेत. त्यांचा नवीन बंगला अद्याप पूर्ण नसल्यामुळे, ते दिपिकाच्या घरी राहणार आहेत. बंगला तयार होताच ते तिथे शिफ्ट होणार आहेत.

- Advertisement -

या जोडप्याने मुंबईत नुकतेच एक नवीन घर विकत घेतले आहे. या बंगल्याची किंमत तब्बल ५० कोटी आहे. नूतनीकरण कार्य पूर्ण झाल्यानंतर ते तेथे जातील.

उद्या ते बंगळुरूला त्यांच्या कुटुंब सदस्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रिसेप्शन साठी रवाना होणार आहेत. त्यानंतर मुंबईमध्ये दोन रिसेप्शन होणार आहेत. २८ तारखेला भावनानी परिवारासाठी तर १ डिसेंबरला त्यांच्या बॉलीवूड मित्र-मंडळींसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -