कपिलच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला चाहत्यांनी केलं ट्रोल!

Mumbai

छोट्या पडद्यावरचा कॉमेडी कींग अर्थात कपील शर्मा. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामुळे कपील घरा घरात पोहचला आणि प्रेक्षकांचा लाडका झाला. नुकतेच कपील शर्माच्या घरी एका नव्या पाहूण्याचे आगमन झाले आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथ हीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपीलने आपल्या मुलीचे नाव अनायरा असं ठेवलं आहे. कपिलने ट्विट करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोडंस मुलीला जन्म दिला आहे. त्याने ट्विट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. तसेच त्याने त्यासोबत आपल्या मुलीचा पहिला फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.“भेटा माझ्या काळजाच्या तुकड्याला” अशा आशयाचे ट्विट करुन त्याने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात हजारो नेटकऱ्यांनी कपीलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या फोटोवर अनेक सेलेब्रेटींनी देखील कमेंट केली आहे. अर्चना पुरणसींग,नेहा कक्कर,नेहा पेंडसे,सई लोकूर या सेलेब्रेटींनी कपीलला आपल्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. पण एका सेलेब्रेटीच्या कमेंटवर चाहत्यांनी त्या सेलेब्रेटीला ट्रोल केलं आहे. हा सेलेब्रेटी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग.

गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. २०१७ मध्ये कपिलने गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विविहबंधनात अडकले होते.

View this post on Instagram

🙏

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here