‘या’ बॉलिवूड स्टारने १२ व्या वर्षी ठेवले होते शरीरसंबंध

Mumbai
Ranveer Singh confessed that he lost his virginity at 12

सध्या बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग हा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने सुरुवातील एका कंडोमच्या जाहिरातीत काम केलं होतं. त्यावेळी या जाहिरातीची चांगलीच चर्चा झाली होती. या जाहिरातीच्या संदर्भात रणवीर सिंगने ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्याला या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला असता रणवीरने असं सांगितलं की, ‘मी १२ वर्षांचा असताना केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते.’

‘ही’ जाहिरात का केली?

ही जाहिरात करण्यामागचं कारणदेखील रणवीरने या मुलाखतीत सांगितलं. ‘मी कारमध्ये बसलो होतो तेव्हा समोर असलेल्या होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहत होतो. त्या विविध जाहिरातीमध्ये अनेक वस्तूच्या जाहिराती दिसल्या पण कुठेही कंडोमी जाहिरात दिसली नाही. आपल्याकडे कंडोमच्या ज्या जाहिराती आहेत त्या अत्यंत प्रक्षोभक आहेत हे मला समजलं. फक्त हीच एक संकल्पना सेक्सची होऊ शकत नाही. पण आता या गोष्टीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहेत. त्यामुळे आपण आता याविषयी मोकळेपणाने बोलू शकतो’, असं रणवीर म्हणाला.

View this post on Instagram

💋 #mondaymotivation

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर या मुलाखतीत अनेक किस्से सांगितले आहेत. त्याने असं सांगितलं की,’खूप कमी वयात मी प्रत्येक गोष्ट केली. मी काळाच्या पुढे होतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. माझ्या मित्राचे आईवडील मी शाळेत असताना नेहमी मला म्हणायचे की, आमच्या मुलांना तू बिघडवत आहेस. सेक्सविषयी माझ्या वयाच्या मुलांना फार काही माहित नव्हतं. त्यामुळे मला असं वाटायला लागलं होतं की, मी यात खूप एक्स्पर्ट झालो आहे.’


हेही वाचा – न्यूझीलंडच्या समलैगिंक क्रिकेटपटूच्या घरी नवीन पाहुणा येणार!


 

रणवीर सिंग सध्या ‘८३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तो क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात रणवीरची पत्नी दीपिका पदुकोण सुध्दा आहे. हे दोघं या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावत आहेत.


हेही वाचा – अखेर व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामची नावं बदलली