घरमनोरंजनरणवीर सिंगची अनोळखी लग्नसोहळ्यात हजेरी!

रणवीर सिंगची अनोळखी लग्नसोहळ्यात हजेरी!

Subscribe

रणवीर सिंग त्याच्या सिम्बा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना या प्रमोशनदरम्यान रणवीरने चक्क एका लग्नामध्ये हजेरी लावली.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कधी काय अतरंगीपणा करेल याचा काही नेम नाही. आपल्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्याचा धक्का देण्यात रणवीर अग्रेसर आहे. नुकतेच त्याने असे काही केले की ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रणवीर सिंग त्याच्या सिम्बा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना या प्रमोशनदरम्यान रणवीरने चक्क एका लग्नामध्ये हजेरी लावली. त्यामुळे तिथे उपस्थित लोकांनी आश्चर्य आणि आनंद व्यक्त केली. खरतरं या लग्नासाठी रणवीरला आमंत्रण नव्हतं. तरीही रणवीर तिथे अनपेक्षितपणे पोहोचला आणि वर-वधूला शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

असा घडला प्रसंग

‘सिम्बा’च्या प्रमोशनदरम्यान रणवीर एका फाईव्ह स्टार हॉटेलबाहेर फोटो काढत होता. यादरम्यान हॉटेलच्या पूल एरियात जावून फोटो काढण्याची इच्छा त्याला झाली. तो लगेच पूल एरियात पोहोचला. पण या पूल एरियात त्यावेळी लग्न सुरू होते. रणवीर पूल एरियाच्या दिशेने येतोय, म्हटल्यावर लग्नातील एका पाहुण्याने त्याला बोलवले. येथे सिंधी लग्न सुरू आहे, रणवीर प्लीज ये…असे हा पाहुणा म्हणाला. हे आमंत्रण स्विकारून रणवीरने लग्नसोहळ्यात प्रवेश केला. साक्षात रणवीरला पाहून सगळेच उत्साहित झालेत. रणवीरने वधू-वराचे हात हातात घेत, त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. नंतर पाहुण्यांसोबत सेल्फीही काढला.

 

View this post on Instagram

 

HD video of #ranveersingh at the wedding

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

वाचा: दीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला

वाचा : दीपिका –रणवीरचं ग्रँड रिसेप्शन २८ नोव्हेंबरला

वाचा : दीपिका-रणवीर wedding : पहिला फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -