घरमनोरंजनरणवीरचा अतिउत्साह; मात्र चाहत्यांची डोकेदुखी!

रणवीरचा अतिउत्साह; मात्र चाहत्यांची डोकेदुखी!

Subscribe

रुपेरी पडद्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातही अतिउत्साहाने वावरणाऱ्या अभिनेता रणवीर सिंगच्या या स्वभावाचा नाहक त्रास त्याच्या चाहत्यांना होत आहे. रणवीरच्या वागणुकीमुळे त्याचे काही चाहते अक्षरशः जखमी झाले आहेत.

अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच उत्साही असतो. चित्रपटाचे प्रमोशन असो वा एखादा अॅवॉर्ड फंक्शन, रणवीर नेहमीच जोषात दिसतो. परंतू रणवीरला हा अतिउत्साहीपणा यावेळी नडला आहे. ‘लॅक्मे फॅशन वीक’ मध्ये रॅम्पवॉक करत असताना त्याने कोणतीही पूर्व सुचना न देता चाहत्यांच्या गर्दीत अचानकपणे उडी मारली. चाहत्यांना याबाबतची कोणतीही कल्पना न दिल्यामुळे चाहतेसुद्धा घाबरले. अचानक उडी मारल्यामुळे चाहते जखमी झाल्याचे समजते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेशा आहे. या कार्यक्रमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल 

रणवीर सिंगचा आगामी चित्रपट ‘गली बॉय’  येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटातील रॅप साँग गात असताना मधेच रणवीरने त्याचा गॉगल आणि हॅट बाजूला काढून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारली. हा संपूर्ण घडलेला प्रकार  व्हिडीओमध्ये कॅप्चर झाला. या घटनेनंतर चाहत्यांकडून रणवीरवर टिका करण्यात होत आहे. अशा प्रकारचा अतिउत्साहीपणा याआधीसुद्धा रणवीरने केला होता. याआधी रणवीरने जे.जे. हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रणवीरने वादग्रस्त वक्तव्य केले होते.

- Advertisement -

‘गली बॉय’ लवकरच होणार प्रदर्शित 

गली बॉय हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर रॅपरची भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेत्री आलिया भट या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रॅपर डिवाइनच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा होत आहे. या सिनेमांच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले आहे. जगभरातील चाहते चित्रपटाचे ट्रेलर तसेच आलिया आणि रणवीरच्या अभिनयाचही कौतुक करत आहेत. प्रेक्षक आता चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -