दीपिकाचा ‘हा’ पुतळा पाहून रणवीर झाला थक्क!

रणवीरने दीपिकाचा हा मेणाचा पुतळा पाहिला आणि तो त्या पुतळ्याच्याही प्रेमात पडला.

Mumbai
दीपिकाचा 'हा' पुतळा पाहून रणवीर झाला थक्क!

उत्कृष्ट सौंदर्य आणि आपल्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत उच्च स्थानी असलेल्या दीपिकाने केवळ बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दीपिकाचा लंडनच्या जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात दीपिकासारखा हुबेहुब दिसणारा मेणाचा पुतळा उभारण्यात आला. नुकतेच दीपिकाने अलीकडे या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी दीपिकाचे आई-वडिल तर उपस्थित होतेच, शिवाय रणवीर सिंग देखील हजर होता. दीपिकाचा हा पुतळा बघताच तो थक्क झाला. पुतळा पाहुन रणवीरची नजर पुतळ्यावरून हटत नव्हती.

तो त्या पुतळ्याच्या प्रेमात पडला

दीपिकाचे सौंदर्य मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पुतळ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा पुतळा हुबेहूब दीपिकासारखाच असल्याने रणवीर त्या पुतळ्याकडे एकटक पाहतच राहिला. रणवीरने दीपिकाचा हा मेणाचा पुतळा पाहिला आणि तो त्या पुतळ्याच्याही प्रेमात पडला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दीपिकाने आयफा अवार्ड्स २०१६ मध्ये जो लाचा घातला होता, त्याच लाचात दीपिकाचा हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here