घरमनोरंजनरणवीर सिंग करणार 'या' व्हिडिओत कॅमिओ

रणवीर सिंग करणार ‘या’ व्हिडिओत कॅमिओ

Subscribe

‘व्हॉट्सअप’ या म्युझिक व्हिडिओमध्ये कॅमिओ

झोया अख्तर दिग्दर्शित गल्ली बॉयमधून रणवीर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच याचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या सेटवर आणि सेटच्या बाहेर रणवीरचा रॅपर्सबरोबर खूपच चांगला बॉन्ड आहे. हा बॉन्ड नेहमीच प्रेक्षकांना दिसला आहे. त्यामुळेच रणवीरला लवकरच डीजे अल्ताफच्या ‘व्हॉट्सअप’ या म्युझिक व्हिडिओमध्ये कॅमिओ करताना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

डीजे अल्ताफने दिला दुजोरा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ रणवीरला गल्ली बॉयच्या सेटवर भेटला. रणवीर या चित्रपटात रॅपरची भूमिका साकारणार आहे. रणवीरला अंडरग्राऊंड हिप-हॉपच्या असणाऱ्या माहितीमुळे अल्ताफला खूपच आश्चर्य वाटले. आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी रॅपर्सने प्रयत्न करायला हवेत यासाठी रणवीरने नेहमीच प्रयत्न केले असल्याचं अल्ताफने सांगितलं. रणवीरच्या कॅमिओमुळे त्याच्या व्हिडिओला नक्कीच एक वेगळा लुक आणि महत्त्व प्राप्त होईल असं अल्ताफला वाटत आहे.

रणवीरमुळेच व्हिडिओ करणं शक्य – अल्ताफ

हिपहॉपर्स आणि रॅपर्स यांच्यासाठी रणवीर सिंह हा स्वतःच प्रेरणा असल्याचं अल्ताफनं नमूद केलं. तो आम्ही तयार केलेली गाणी आणि संगीत अगदी मनापासून ऐकतो आणि त्याचा आनंद घेतो. रणवीरने या व्हिडिओमध्ये खूपच मजा केली असून मला खूप प्रेरणा दिली आहे. रणवीर हा व्हिडिओ करण्यासाठी तयार झाला यासाठी मला मनापासून आनंद झाला असून त्याला कसे धन्यवाद द्यावेत हेच कळत नाही अशी भावनादेखील त्याने यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

सध्या रणवीरचा गल्ली बॉय पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला रणवीर आणि दीपिका डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या बातमीवर रणवीर अथवा दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपलं नातं त्यांनी कधीही लोकांसमोर उघड केलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -