घरमनोरंजनरणवीर सिंग याला बनायचे आहे; तैमूर अली खानचा पप्पा

रणवीर सिंग याला बनायचे आहे; तैमूर अली खानचा पप्पा

Subscribe

करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये अभिनेता रणवीर सिंग याने सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर यांचा वडिल बनायला आवडेल असे म्हटले आहे.

दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याचा बहुचर्चीत टीव्ही चॅट शो कॉफी विद करण पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या आठवड्यात बॉलीवूडचे दोन प्रतीभवंत अभिनेता रणवीर सिंग आणि अक्षय कुमार या शोमध्ये आले होते. यंदाच्या सीजनमध्ये पहिला एपिसोड पाहून प्रेक्षकांना नेहमीसारखा आनंद मिळाला नाही. मात्र रणवीर आणि अक्षयच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना भरपूर मजामस्ती आणि मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या. हा एपिसोड प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या शोमध्ये रणवीरने असे काही गुपीत उघड केले, ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. या शोमध्ये रणवीर सिंगने खुलासा केला आहे की, ते करण जोहर यांनी नाकारलेले कपडे परिधान केले आहेत. याच कपड्यांमुळे त्यांचा बॉलीवूडमधील फंकी लुक खुपच प्रचलीत झाला आहे. चॅट शोमध्ये जेव्हा करण जोहरने रणवीरसोबत रॅपिड राऊंड सुरु केला, तेव्हा आणखी एक मजेदार प्रश्न त्याला विचारण्यात आला.

 

View this post on Instagram

 

@akshaykumar and @ranveersingh channel their 90s dance moves on #KoffeeWithKaran! #KoffeeWithAkshay #KoffeeWithRanveer

A post shared by Star World (@starworldindia) on

- Advertisement -

काय विचारले करणने रणवीरला 

जर तुला कोणा एका खानसोबत काम करण्याची संधी मिळाली तर तुला कोणासोबत काम करायला आवडेल. शाहरुख खान, सलमान खान किंवा आमिर खान. यावर उत्तर देताना रणवीर सिंग म्हणाला, तैमूर अली खान. जेव्हा तैमूर अभिनेता बनेल तेव्हा त्याच्या पप्पाची भूमिका करायला मला आवडेल. तो माझ्या म्हातारपणाचा आधार बनेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -