घरमनोरंजनJayeshbhai Jordaar: रणवीर बनला गुजराती छोकरा!

Jayeshbhai Jordaar: रणवीर बनला गुजराती छोकरा!

Subscribe

बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंगचा नवीन चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चं पोस्टर रिलीज. रणवीर आता दिसणार एका गुज्जू छोकऱ्याच्या रुपात.

कपिल देव यांची बायोपिक ‘८३’ चं चित्रीकरण संपल्यानंतर आता एका नवीन चित्रपटासाठी रणवीर हा सज्ज झालेला आहे. गली बॉयमधला रॅपर मुराद, ८३ मधला क्रिकेटर कपिल देव आणि पदमावतमधल्या सुलतान खिलजीनंतर आता ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटातून गुज्जू छोकऱ्याच्या रूपात रणवीर प्रेक्षकांना दिसणार आहे. तर डेब्यू दिग्दर्शक दिव्यांग ठक्करनं या चित्रपटातील रणवीरचं फर्स्ट लुक शेअर केलेलं आहे आणि रणवीर या लुकमध्ये फार वेगळा दिसत आहे.

- Advertisement -

 

कसा आहे रणवीरचा लुक?

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रणवीर एका ऑरेंज रंगाच्या पोलका डॉट असलेला पोलो नेक टि-शर्टमध्ये दिसत आहे आणि त्यांनं एक ग्रे रंगाची पँट घातली आहे. तर त्याच्या एका हातात एक गोल्डन घड्याल असून दुसऱ्या हातात काही दोरे थागे दिसत आहे. अगदी साध्या कपड्यात रणवीर दिसत आहे. त्याच्या मागे अनेक बायका दिसत आहे आणि सगळ्या बायकांनी डोक्यावर पदर ओडलेलं दिसतय. तर रणवीर कोणाला तरी घाबरून त्या बायकांना वाचवायचा प्रयत्न करत आहे असं काहीतरी पोस्टर पाहून वाटत आहे. रणवीरनं या भूमिकेसाठी वजन देखील कमी केल्या सारखं वाटत आहे.

‘जयेशभाई हा एक साधारण व्यक्ती असून तो संवेदनशील आणि दयाळू आहे. या पुरुष प्रधान समाजात महिला आणि पुरूषांना एक सारखं स्थान मिळायला पाहिजे असं जयोशभाई यांना वाटतं. ही भूमिका करण्यासाठी मी फार उत्साहित आहे कारण मी पहिल्यांदाच अश प्रकारची भूमिका सादर करणार आहे’ –

रणवीर सिंग, अभिनेता.

- Advertisement -

रणवीरचा हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर त्याच्या काही चाहत्यांनी यावर टिका केली. रणवीरचा हा पोस्टर कॉपी केलेला आहे असं या चाहत्यांचं म्हणणं आहे. तर या चाहत्यानं रणवीरचा जयेशभाई जोरदारचा पोस्टरची तुलना कंगना रनौतच्या तनु वेड्स मनु या चित्रपटाच्या पोस्टरशी केलेली आहे.

तर आता पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या घरी म्हणजे यश राज फिल्मच्या चित्रपटात रणवीर दिसेल. या चित्रपटाचं दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर असून हा चित्रपटाची रिलीज डेट किंवा रणवीरसह या चित्रपटात कोण दिसणार आहे हे अद्याप कळलेलं नाही.


हेही वाचा: दबंग ३ मध्ये सई सोबत आहेत आणखी २ मांजरेकर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -