‘मी मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची व्हर्जिनिटी टेस्ट करतो’

एका चॅट शो दरम्यान हा खुलासा केला

Mumbai

अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर टीआय याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. टीआयला एक १८ वर्षांची मुलगी आहे. टीआय आपल्या मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला या मुलीची व्हर्जिनिटी टेस्ट अर्थात कौमार्य चाचणी करतो. टीआयच्या या धक्कादायक विधानामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका चॅट शोमध्ये टीआयने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

एका चॅट शो मध्ये बोलताना टीआय म्हणाला, माझी मुलगी १८ वर्षांची आहे. मी तीच्या प्रत्येक वाढदिवसाला वर्जिनिटी टेस्ट करून घेतो. त्याचे हे विधान ऐकून सगळे प्रेक्षक थक्क झाले. आधी सगळ्यांना टीआय गंमत करतोय अस वाटलं पण नंतर टीआय खूप गंभीरपणे बोलत असल्याचे कळताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

होस्टने टीआयला मुलीसोबत सेक्स बद्दल बोलतोस का असा प्रश्न विचारला होता. होस्टला सेक्स एज्यूकेशन बद्दल बोलतोस का असे विचारायचे होते. मात्र यावर टीआय़ने वेगळेच उत्तर देत धक्कादायक खुलासा केला. टीआयने सांगितले माझी मुलगी १८ वर्षांची आहे. मी तीच्या प्रत्येक वाढदिवसाला वर्जिनिटी टेस्ट करून घेतो. ती गायनाककडे जाते तेव्हा मी सुध्दा तीच्याबरोबर जातो. मी डॉक्टरांना तीच्या व्हर्जिनीटी टेस्टचा रिपोर्ट दाखवा असा म्हटले तेव्हा डॉक्टरांनी सुरूवातीला नकार दिला. पण नंतर मुलीची परवानगी आहे म्हटल्यावर त्यांनी मला रिपोर्ट दाखवले.

टीआयच्या या खुलाश्यानंतर सोशलमिडीयावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. चाहतेही त्याच्यावर नाराज झाले आहेत. यापूर्वी टीआय़ला २००९मध्ये अनधिकृत मशीन गन खरेदी केल्याप्रकरणी सात महिने तुरूंगात होता. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणी त्याला दहा महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली होती.