Bigg Boss 14: ‘बिग बॉस’च्या घरात होणार ‘या’ नव्या ‘तूफानी सिनिअर्स’ची एंट्री?

लवकरच घरात आणखी तीन नव्या ‘तूफानी सिनिअर्स’ची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

सध्या ‘बिग बॉस 14’ हा सीझन चांगलाच लोकप्रिय होत असून त्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहे. हा रिअॅलिटी शो सुरू झाला तेव्हापासून त्या शोमध्ये वाद-विवाद सुरू झाले. सध्या ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘तूफानी सिनिअर्स’चे राज्य सुरू आहे. सिद्धार्थ शुक्ला, हीना खान आणि गौहर खान हे तीनही तूफानी सिनिअर केवळ 14 दिवसांसाठी घरात असणार आहेत. त्यांना या 14 दिवसांत नव्या स्पर्धकांपैकी घरात राहण्यास पात्र असलेले स्पर्धक शोधायचे आहेत. आणखी काही दिवस या घरात तूफानी सिनिअर्सचे मुक्काम असणार आहे. मात्र, लवकरच घरात आणखी तीन नव्या ‘तूफानी सिनिअर्स’ची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

नव्या फ्रेशर्ससह तीन माजी स्पर्धकांची एंट्री 

‘बिग बॉस 14’च्या घरात सध्या असलेले ‘तूफानी सिनिअर्स’ घराबाहेर गेल्यानंतर नव्या फ्रेशर्ससह तीन माजी स्पर्धकांची एंट्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या ‘तूफानी सिनिअर्स’मध्ये माजी स्पर्धक असिम रियाझ, गौतम गुलाटी आणि रश्मी देसाई ‘बिग बॉस 14’मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. ‘

असिम, रश्मी आणि गौतम गुलाटी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत की नाही हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आले नसले तरी, सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा होत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात ज्याप्रकारे सिद्धार्थ, गौहर आणि हीना एकत्र फ्रेशर्सबाबत निर्णय घेत आहेत, त्याचप्रमाणे काही नवीन स्पर्धकदेखील निर्णय घेतील.

निक्की तांबोळीमुळे साराच्या डोळ्याला इजा

सध्या ‘बिग बॉस १४’ टास्कदरम्यान एकमेकांवर कुरघोडी करणं, एकमेकांना कमी लेखण्यापासून ते आता एकमेकांना शारीरिक दुखापत करण्यापर्यंतही हे वाद पोहोचले आहे. बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान साराला निक्की तांबोळीकडून दुखापत झाली. इम्युनिटी टास्कदरम्यान सारा जेव्हा बुलडोझरवर बसली तेव्हा तिला तिथून उठवण्याचा जोरदार प्रयत्न निक्कीकडून केला जात होता. त्याच प्रयत्नात निक्कीचा हात साराच्या तोंडाजवळ गेला आणि तिची नखं साराच्या डोळ्याला लागली. दुखापत होताना आणि झाल्यानंतरचा काही भाग बिग बॉसच्या एपिसोडमधून एडिट करण्यात आला. साराच्या डोळ्यावर सध्या उपचार सुरू असून त्यानंतर ती तिच्या गावी परतणार असल्याचं म्हटलं जात आहे.