घरमनोरंजनथुकरट वाडीत रंगणार 'रात्रीस खेळ चाले'

थुकरट वाडीत रंगणार ‘रात्रीस खेळ चाले’

Subscribe

नुकतंच चला हवा येऊ द्या चे 'नवीन पर्व होउ दे व्हायरल' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात रात्रीस खेळ चाले मालिकेवर आधारित एक धमाल विनोदी स्पूफ विनोदवीर सादर करणार आहेत.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला देखील गाठला आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला आहे. मात्र आता ४०० भागांनंतर या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे ‘नवीन पर्व होउ दे व्हायरल’ प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

असा रंगणार थुकरट वाडीतील रात्रीस खेळ चाले

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील बच्चे कंपनी, शेवंता आणि अण्णा थुकरट वाडीत सज्ज होणार आहेत. आता हे सगळे कलाकार थुकरट वाडीत आल्यानंतर विनोदवीरांनी देखील एकच कल्ला केला आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेवर आधारित एक धमाल विनोदी स्पूफ हे विनोदवीर सादर करणार आहेत. ज्यात भाऊ कदम ‘अण्णा’, श्रेया बुगडे ‘शेवंता’, कुशल बद्रिके ‘माई’ आणि बाकी कलाकार बच्चे कंपनी साकारणार आहे. त्यांचा हा ऍक्ट पाहून प्रेक्षक पोट धरून हसणार यात शंकाच नाही. त्यामुळे हि धमाल मस्ती येत्या १८ ,१९ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता पाहता येणार आहे.

- Advertisement -

वाचा – पु. ल. झाले आता तेंडुलकर

वाचा – मैं हु स्टारसन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -