शेवंता पुन्हा येतेय प्रेक्षकांना करायला क्लीन बोल्ड

ratris khes chale 2 fem actress apurva nemlekar comeback in new marathi serial
शेवंता पुन्हा येतेय प्रेक्षकांना करायला क्लीन बोल्ड

‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले २’मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरक्षः वेडं लावलं. संपूर्ण महाराष्ट्र शेवंताच्या अदांवर भाळला होता. रात्रीस खेळ चाले २ संपल्यानंतर शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर भावूक झाली. तिने फेसबुकवर लांबलचक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंतला खूप मिस करत आहेत. पण आता शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच पुन्हा एकदा टेलिव्हिडनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत कमबॅक करणार आहे.

‘झी युवा’वरील आगामी मालिका ‘तुझं माझं जमतंय’ मध्ये लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झालीय. या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडका देणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आजकाल अपूर्वा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिने अनेक जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले आहे. पण आता पुन्हा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी अपूर्वा लवकरच येणार आहे.