दाक्षिणात्य लोकांमध्ये सेलेब्रेटींबदद्ल नेहमीच क्रेझ असते. आपल्या आवडत्या कलाकारांवर जीव ओवाळून टाकायलाही ते कमी करणार नाहीत. कारण त्यांचे प्रत्येक कलाकारांवर अतोनात प्रेम असते. मात्र हेच प्रेम एखाद्या वेळेस एका चाहत्याच्या अंगाशी आलं आहे. केरळमध्ये हा प्रकार घडला आहे. बिग बॉस फेम रजित कुमार यांना भेटण्यासाठी कोची विमानतळावर गर्दी करणाऱ्या चाहत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
रजित कुमार सध्या बिग मल्याळमच्या दुसऱ्या पर्वामुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांना बिगच्या घरातून बाहेर करण्यात आले. शोमधून बाहेर पडलेल्या रजित यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी कोची विमानतळावर गर्दी केली होती. जवळपास ७९ लोक विमानतळावर जमा झाले होते. मात्र या चाहत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी बी. सुहास यांनी दिले आहेत.
करोनाचा विषाणूची लागण होऊ नये म्हणून केरळ सरकारने जमाव बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु हे आदेश फेटाळून करोनाची तमा न बाळगता काही लोक अजित यांना पाहण्यासाठी विमानतळावर गेले. त्यामुळे या लोकांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.