घरताज्या घडामोडीअभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि मुलगा निर्वाण खानवर गुन्हा दाखल

अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि मुलगा निर्वाण खानवर गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि मुलगा निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. २५ डिसेंबरला तिघे जण युएईवरून परतले होते, त्यावेळेस मुंबईच्या ताज हॉटेलवर बुकींग असल्याचे सांगून परस्पर घरी निघून गेल्याचे समोर आले. त्यामुळे एअरपोर्ट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि मुलगा निर्वाण खान या तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांकडून अशा प्रकारे कोरोना संदर्भात हलगर्जी पणा होणे, ही अत्यंत वाईट बाब आहे. अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि मुलगा निर्वाण खान यांच्याविरोधात ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ भारतीय दंड संहिता २८६० नुसार एफआयआर दाखल केला आहे. सध्या ब्रिटन आणि युएईवरून आलेल्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटाईन होणे हे सक्तीचे आहे. त्यामुळे त्यांचे २४ व २५ ला वांद्रे येथील ताज लॅन्ड एन्ड या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगिकरणासाठी रूम बुकिंग केले होते. त्यानुसार त्यांनी या हॉटेलमध्ये ७ दिवसांसाठी जाणे व राहणे अपेक्षीत होते. मात्र हे तिघेही या हॉटेलमध्ये फिरकलेसुद्धा नाही. तसेच, २६ जानेवारी रोजीचे आरक्षणही रद्द करण्यात आल्याचे पालिकेने केलेल्या चौकशीत उघडकीस आले आहे.

- Advertisement -

या तिघांनी कोरोनामय वातावरणात केलेली गंभीर चूक पाहता पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या तिघांना मुंबईत येऊन आज दहा दिवस उलटले. त्यानंतर पालिकेला जाग आली आणि पालिकेतर्फे डॉ.संजय फुंदे यांनी खार पोलीस ठाण्यात या तिघांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे आता या तिघांवर कायदेशीर कारवाई होणे अटळ आहे. तसेच, त्यांना भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी सक्तीने ठेवण्यात येणार आहे. माहितीनुसार भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास या कोविड सेंटरमध्ये त्यांना थोड्या वेळात नेण्यात येईल. येत्या ९ तारखेपर्यंत त्यांना इथे ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.


हेही वाचा –  सैफ अली खानचा सोशल मीडियावर ‘तांडव’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -