घरमनोरंजनरेहमानचा आवडता खेळ म्युझिक

रेहमानचा आवडता खेळ म्युझिक

Subscribe

सध्या ओडिशाच्या भुवनेश्वर येथे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाचे आयोजन केलेले आहे. हॉकी या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या हेतूने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पुढाकार घेतलेला आहे. खेळातला उत्साह, ओडिशा राज्याची महती, तिथले जीवनमान, प्रगती अधोरेखित करणारे गीत प्रसिद्ध दिग्दर्शक, गीतकार गुलजार यांच्याकडून लिहून घेतलेले आहे. हे गीत श्रवणीय व्हावे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घेतली जावी यासाठी जागतिक कीर्तीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडून हे गीत संगीतबद्ध करून घेतलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावरच हे गीत चित्रीतही झालेले आहे आणि त्याला किंग खान शाहरूख खान याची सोबत लाभलेली आहे. लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हीसुद्धा या गीतात पहायला मिळते. नुकतेच या गीताचे अनावरण मुंबईत करण्यात आले. त्यावेळी स्वत: ए .आर. रेहमान, ओडिशाचे मंत्रीमंडळ, क्रीडा विभागाचे प्रमुख उपस्थित होते. हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ए .आर. रेहमान यांनी गाण्याविषयी आपले मत व्यक्त करताना आपला आवडता खेळ म्हणजे संगीत असे सांगून या गाण्यामागची प्रेरणा आणि खेळाविषयीची आस्था कशी प्रतिबिंबीत झाली हे आपल्या भाषणात सांगितले. ‘जय हो’ हे गाणे ज्या पद्धतीने गाजले त्या प्रमाणे हेही गाणे चाहत्यांना आवडेल असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -