घरमनोरंजनप्रेक्षकांनाही बघायला मिळणार बिग बॉस मराठीचं घर!

प्रेक्षकांनाही बघायला मिळणार बिग बॉस मराठीचं घर!

Subscribe

मराठी बिग बॉस सुरू झालं आणि नाक्यावर, रेल्वेत, चहाच्या टपरीवर केवळ बिग बॉसच्या चर्चा रंगू लागल्या. बिग बॉसच्या घराचं मराठमोळं रूप स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांनाही भावलं. बिग बॉस मराठीचं घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केलं आहे. प्रेक्षकांनाही हे घर बघण्याची नक्कीच उत्सुकता असेल आणि हीच प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.

क्या बात! बिग बॉसचं डिट्टो घर!

बिग बॉसच्या घराचं प्रतिरूप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घराची हुबेहुबे प्रतिकृती एका बसमध्ये बनवण्यात आली आहे. बिग बॉसचा आवाज असो, की घरातील छोट्या मोठ्या गोष्टी, महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, घरात सदस्यांनी घातलेले राडे, भांडणं, यावर प्रेक्षकांनी वेळोवेळी आपली मतं नोंदवली. घरातील काही सदस्यांनी पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांची मनं जिकंली.

- Advertisement -

कसं आहे बिग बॉसचं घरं?

बिग बॉस मराठीचे हे सुंदर घर एका बसमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रूम आणि कन्फेशन रूम असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच बिग बॉस मराठीचं घर बघण्याची इच्छा पूर्ण झाली असं वाटेल. गार्डन एरियामध्ये सदस्य बरेच टास्क करतात. सई, मेघा, रेशम, भूषण या घरातील सदस्यांची मैत्री याच एरियात झाली. तसंच कन्फेशन रूम या ठिकाणी थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधतात, त्यांचं मन मोकळं करतात, त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात. तसेच या बसमध्ये ‘बा’चा टीव्हीदेखील तयार करण्यात आला आहे. ही बस अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, वाशिम, औरंगाबाद या शहरांमध्ये फिरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -