ओटीटीवर करमणुकीचा ओघ सुरूच; ‘या’ ५ वेब सीरिजची होणार एन्ट्री!

ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता या पाच वेबसीरिज प्रदर्शित होणार

Mumbai

लॉकडाऊनमुळे थिएटर बंद आहेत. जुने कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होत असले तरी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर करमणुकीचा प्रवास अजून संपलेला नाही. लॉकडाऊन १ ते लॉकडाऊन ४ पर्यंत नवे कार्यक्रम सातत्याने येत आहेत. सध्या हा प्रवास येत्या काही दिवसांत थांबणार नसून हा करमणुकीचा ओघ असाच सुरू राहणार आहे…येत्या काही दिवसात ‘या’ ५ वेब सीरिज एन्ट्री होणार आहे.

1. रक्ताचंल

एमएक्स प्लेयर गेल्या काही दिवसांपासून आपला कंटेन्ट सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर अशा काही वेब सीरिज आल्या ज्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशीच एक वेब सीरिज येत आहे रक्ताचंल. यात पूर्वांचलच्या ८०च्या दशकात दोन बाहुबलींमध्ये वर्चस्वाची लढाई दिसून येते. या वेब सीरिजचे आज २८ मे रोजी स्ट्रीमिंग करण्यात आले आहे.

2. काली सीज़न

पहिल्या सीज़नच्या यशानंतर झी -5 वेब सीरिज कालीचा दुसरा सीझन येणार आहे. या वेळी प्रेक्षकांना नवीन कलाकाराची एंट्रीही बघायला मिळणार आहे. ‘पाताल लोक’मध्ये हातोडा त्यागीची भूमिका करणारा अभिषेक बॅनर्जी या मालिकेत दिसणार आहेत. या सीझनमध्येही ही कथा आई आणि मुलाभोवती फिरताना दिसते. ही सीरीज २९ मे रोजी स्ट्रीमिंग होणार आहे.

3. चोक्ड

अनुराग कश्यप पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर पुनरागमन करीत आहे. ‘घोस्ट स्टोरीज’ नंतर तो ‘चोक्ड’ ही सीरिज घेऊन येत आहे. चित्रपटात नोटाबंदीनंतरच्या काळातील एका महिलेची कहाणी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सैयामी खेर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

4. कहने को हमसफ़र हैं

रोनित रॉय आणि मोना सिंग यांची ‘कहानी को हमसफर है’ ही वेब सीरिजही कमबॅक करत असून त्याचा हा तिसरा सीझन येणार आहे. वेब सीरिजमध्ये पुन्हा एकदा कौटुंबिक नाटक सादर केले जाणार आहे, ६ जून रोजी ही सीरिज झी -5 वर स्ट्रीमिंग होणार आहे.

5. द कैसीनो

करणवीर बोहरा देखील डिजिटल पदार्पण करण्यास सज्ज आहे. यासाठी त्यांनी झी -5 वेब सीरिज ‘द कॅसिनो’ निवडली आहे. यामध्ये नेपाळमधील कॅसिनोसाठी चालू असलेल्या कौटुंबिक लढाईची कहाणी दाखवण्यात आली आहे. ही सीरिज १२ जून रोजी स्ट्रीमिंग होणार आहे.