रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणीवर दाखल केला फसवणूकीचा गुन्हा

रियाने मुंबईत फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणास नवे वळण

रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतर काही लोकांविरोधात बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रियाने एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शकतत्त्वे २०२० च्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ड्रग चॅट प्रकरणात रिया चक्रवर्तीवर सध्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, या प्रकरणात रियाला अटक केली जाऊ शकते.

रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सुशांतसिंह राजपूतला त्याची बहीण प्रियंका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्या औषधांचा उल्लेख होता, जो एनडीपीएस कायद्यांतर्गत येतो आणि त्याला मनाई आहे.

रियाने दिलेल्या तक्रारीत बनावट प्रिस्क्रिप्शन लिहिणार्‍या डॉक्टरलाही दोषी ठरवले आहे. प्रियंकाच्या सांगण्यावरून सुशांतची तपासणी न करता डॉ कुमार यांनी त्यांना नैराश्याची औषधे दिली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. हे अनेक प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. रियाने तक्रारीत म्हटले आहे की, डिस्क्रिप्शन दिल्लीच्या ओपीडीचे असून मृत सुशांत त्या दिवशी मुंबईत होता.

रियाच्या तक्रारीत असे लिहिले आहे की, तरुण कुमार डॉक्टर पेशाने कार्डिओलॉजिस्ट आहेत, तरीही त्याने मानसिक आजारांशी संबंधित नैराश्याच्या औषधांची बनावट प्रिस्क्रिप्शन बनविली आहे. यासह रियाच्या तक्रारीत असे म्हटले आहे की सुशांतची बहीण प्रियंकाशिवाय डॉ.कुरुण कुमारवरही गुन्हा दाखल करावा. रियाने मुंबईत फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणात नवे वळण लागले आहे.


Video: कोणाशी पंगा घेणार नाही, वडिलांनी दिली कंगणाला समज!