घरताज्या घडामोडीएका चित्रपटासाठी रिंकू घेते इतके मानधन?

एका चित्रपटासाठी रिंकू घेते इतके मानधन?

Subscribe

‘सैराट’ नंतर रिंकू राजगुरू आता पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात 'मेकअप' या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. रिंकूने तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’ साठी तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अगदी मनामनात पोहचलेली अभिनेती आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू सर्वांना ठाऊकच असेल. कमी वयात इतकी जबरदस्त प्रसिद्धी मिळवणाऱ्यापैंकी ती एक. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने सर्वांनाच वेड लावले होत. ‘सैराट’ चित्रपटानंतर नंतर तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतून तिने वेबसीरिसच्या दुनियेत देखील प्रवेश केला आहे. अशातचं आता रिंकू पुन्हा एकदा एका नव्या अंदाजात ‘मेकअप’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते फारचं उत्सुक झाले आहेत. मात्र रिंकूच्या चाहत्यांना एक प्रश्न नक्की पडला असले तो म्हणजे रिंकू एका चित्रपटासाठी किती मानधन घेते? आता याचं प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.

रिंकू एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

रिंकूने तिचा आगामी चित्रपट ‘मेकअप’साठी तब्बल २७ लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जात आहे. रिंकूची ‘सैराट’ या चित्रपटानंतरची एकंदरीत लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी तिला इतके मानधन दिले असल्याची चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फार कमी अनुभव असणारी आणि मानधन जास्त घेणारी अभिनेत्री असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

- Advertisement -

 चित्रपट कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? 

लवकरच रिंकूचा ‘मेकअप’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रिंकू आणि अभिनेता चिन्मय उदगीरक ही जोडी एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तसेच रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -