‘एकदम कडक’च्या मंचावर रिंकूने शेअर केलं ‘हे’ गुपीत

मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा नवा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने मंचावर हजेरी लावली आहे.

Mumbai
rinku rajguru
सैराट या चित्रपटातून रिंकू राजगुरुने महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात स्थान मिळवले.

कलर्स मराठीवरील एकदम कडक या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील भाग विशेष असणार आहे. कारण कार्यक्रमाच्या मंचावर गप्पा रंगणार आहेत प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकरांसोबत. अवघ्या महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक म्हणजेच नागराज मंजुळे आणि मकरंद माने तसेच संपूर्ण महाराष्ट्राची मने ज्या दोन कलाकरांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटामध्ये जिंकली असे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एकदम कडकच्या मंचावर येणार आहेत. मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा नवा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने मंचावर हजेरी लावली आहे.

kagar team
कागरची टीम एकदम कडकच्या मंचावर

या दरम्यान या सगळ्यांनीच बऱ्याच गंमतीजमती, किस्से, आठवणी सांगितल्या. कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे. तर एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केलं आहे. या भागामध्ये नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे.

Akdam kadak
एकदम कडक

या कार्यक्रमादरम्यान आकाश आणि रिंकूला रॅपीड फायरचे अनेक प्रश्न विचारले. त्यावर या दोघांनी अनेक गमतीशीर उत्तर दिली. रिंकूने या वेळी विकी कौशल बरोबर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली.

रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर  सुंदर डान्स सादर केला आहे. कागर या चित्रपटातील संपूर्ण टीमने त्यांचा चित्रिकरणा दरम्यानचा अनुभव, किस्से, त्यांच्या भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. रिंकूने सांगितले कागर सारखा सिनेमा येण्याची मी वाट बघत होते कारण यातली माझी भूमिका वेगळी आहे आणि चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे. याच बरोबर कागर चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी कागर चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here