ऋषी कपूर यांनी दसऱ्यानिमित्त केला हा आगळावेगळा फोटो शेअर

Mumbai
Rishi-Kapoor
अभिनेता ऋषी कपूर

बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या विनोदबुद्धीसाठी ओळखले जातात. तसे पोस्ट आणि फोटोज ते आपल्या सोशल मीडियातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. अशीच एक मजेशीर पोस्ट त्यांनी दसऱ्यानिमित्त केली आहे. आज, विजयादशमीच्या निमित्ताने त्यांनी शस्त्रपुजेसाठी ओपनर हे हत्यार सुचवले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर ऋषी कपूर यांनी ट्विट केल आहे.

काय आहे ट्विटमध्ये  

बाटलीचे बूच उघडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ओपनर फोटो ऋषी कपूर यांनी ट्विट केला आहे. या ओपनरला हळद-कूंकू अर्पण करून त्याची शस्त्र म्हणून पूजादेखील केली आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. त्याचबरोब अशी शस्त्र जबाबदारीने वापरण्याचा सल्लाही दिला आहे. त्यांच्या या विनोदबुद्धीला नेटिजन्सनेही दाद दिली आहे. हे जगातील सगळ्यात धोकादायक शस्त्र आहे, असे कमेंट्स त्यांच्या ट्विटवर चाहत्यांनी केले आहेत.

कॅन्सरशी लढा देऊन परत आले 

बॉलिवूड स्टार ऋषी कपूर हे आपल्या कर्करोगावर न्यूयॉर्कहून उपचार करून भारतात मागच्या महिन्यात परतले आहे. कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूरने नुकतेच आपले फोटोशूट केले. प्रसिद्ध तसेच नावाजलेले फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी ऋषी कपूर यांचे फोटोशूट केले होते. हे फोटोशूट झाल्यानंतर अविनाश गोवारीकर यांनी ऋषी कपूर यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्या या पोस्ट केलेल्या नवीन फोटोवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स आले. अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.