लयभारी म्हणत रितेशच्या ‘माऊली’चं पोस्टर रिलीज

दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या आगामी मराठी चित्रपट 'माऊली'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Mumbai
ritesh deshmukh sayami khair
रितेश देशमुखसोबत सयामी खैर

दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या आगामी मराठी चित्रपट ‘माऊली’चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. आता आपली बारी, लयभारी अशी टॅगलाईन या पोस्टरवर दिली आहे. हातात पट्टा पकडतं डरकाळी फोडणाऱ्या वाघासारखा रितेशचा रावडी लुक दिसत आहे. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जिनेलिया डिसूजा यांनी माऊलीची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ डिसेंबर २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लयभारीचा सिक्वल नाहीच

या नव्या सिनेमात रितेश लई भारीमधल्या माऊलीचं पात्र साकारत असला तरी, नवा ‘माऊली’ सिनेमा लई भारीचा सिक्वल किंवा प्रिक्वल नाही. ‘माऊली’ हे नाव आणि पात्र वगळता या दोन्ही सिनेमांचा काहीच थेट संबंध नसल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे नवा माऊली सिनेमा लई भारीची फ्रेन्चाइजी असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात अभिनेत्री सयामी खेर रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिकेत दिसेल. ‘फास्टर फेणे’ सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार माऊलीचं दिग्दर्शन करणार असून, सिनेमामध्ये अजय-अतुलचं संगीत असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here