घरमनोरंजनडिसेंबरमध्ये होणार माऊलीचे दर्शन

डिसेंबरमध्ये होणार माऊलीचे दर्शन

Subscribe

'लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश मराठी प्रेक्षकांसाठी कोणता नवा चित्रपट आणणार याची सर्वांना उत्सुकता होती. परंतु रितेशच्या चाहत्यांना आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही. रितेशने त्याच्या नव्या मराठी चित्रपटाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख आज जाहीर केली आहे.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने १२ लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात विठूनामाचा गजर सुरू आहे. आजच्या या शुभदिनाचे औचित्य साधून बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या चाहत्यांसाठी एक भेट दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या रितेशच्या ‘माऊली’ या दुसऱ्या मराठी चित्रपटाचे दुसरे पोस्टर रितेशने आज चाहत्यांसाठी ट्विटरवर अपलोड केले आहे. त्यासोबतच त्याने हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हेदेखील जाहीर केले आहे. रितेशचा माऊली हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील ट्विट करुन या बातमीला दुजोरा दिला आहे.

 

- Advertisement -

असा आहे रितेशचा माऊली

रितेशने आषाढीनिमित्त अपलोड केलेल्या पोस्टरमध्ये विठ्ठलाचे सुंदर रूप पहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी मध्यभागी रितेश देशमुख (नायक) उभा असून त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. त्याच्या पाठी त्याची सावली पडलेली पहायला मिळत आहे. या सावलीमध्ये विठ्ठलाची छटा पहायला मिळतेय. नायकाच्या (रितेशच्या) समोर अनेक गुंड त्याला मारायला आलेले दिसत आहेत. विठ्ठलाची सावली दर्शवते की, कितीही शत्रू आले तरी मी तुझ्यापाठी (नायकाच्या) सावलीसारखा उभा आहे.

- Advertisement -

 

यांनी साकारला माऊली

हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. मुंबई फिल्म कंपनी आणि हिंदूस्तान टॉकीजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. क्षीतीज पटवर्धन यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून सर्वांचे लाडके संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात रितेश देशमुखसोबत बॉलीवू़ड अभिनेत्री सयामी खेर प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे.

 

 

लय भरीचा सिक्वल?

रितेश देशमुखचा ४ वर्षांपूर्वी आलेला ‘लय भारी’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात रितेशच्या पात्राचे नाव माऊली असे होते. या चित्रपटाला विठ्ठल, पंढरपुर या गोष्टींची पार्श्वभूमी होती. माऊली हा चित्रपटदेखील तसाच असल्यामुळे अनेकांना हा चित्रपट लय भारीचा सिक्वल आहे का? असा प्रश्न पडला आहे. परंतु अद्याप रितेश किंवा चित्रपटाच्या टीमपैकी कोणीही असे म्हटले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -