म्हणून रितेशने मानले अजित पवारांचे आभार

Mumbai

मुंबईतील इस्टर्न फ्री वे मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे, नुकतीच याची घोषणा करण्यात आली. याची लवकरात लवकर कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला दिली आहे. या घोषणनंतर विलासराव देशमुख यांचे पुत्र अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटरवरून आभार मानले आहेत.

मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.’इस्टर्न फ्री वे मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रितेश भावूक झाला. रितेशने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. रितेशने ट्विट मध्ये म्हटले आहे की, श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्याबद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा असे ट्विट रितेशने केले आहे.

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या. दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here