Wednesday, January 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रियामुळे आणखी एक सेलिब्रिटी अडचणीत, होतोय ट्रोलर्सचा शिकार

रियामुळे आणखी एक सेलिब्रिटी अडचणीत, होतोय ट्रोलर्सचा शिकार

दोघांचा फोटो सोशल मिडियावर घालतोयं धूमाकुळ

Related Story

- Advertisement -

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर जग जाहीर झालेली बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण रिया सारे काही विसरुन पुन्हा एकदा तिची लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे. परंतु तिची ही एन्जॉयमेंट एका सेलिब्रिटीला चांगलीच महागात पडली आहे. रिया नुकतीच अनुषा दांडेकरच्या ‘बर्थ डे’ पार्टीमध्ये एन्जॉय करत होती. परंतु ही पार्टी अनुषापेक्षाही रियामुळे चर्चेचा विषय ठरली. या पार्टीत रिया चक्रवर्तीसोबत अनुषाचा खास मित्र फरहान अख्तर आणि एमटीव्ही रोडीजचा जज राजीव लक्ष्मणही मजा करत होता. या पार्टीतील रियासोबतचा एक फोटो राजीवने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत ‘माय गर्ल’ असे या फोटोला कॅप्शन दिली आहे. परंतु या फोटोमुळे सोशल मिडियावर रियासह राजीवला बरेच ट्रोल करण्यात आले. अखेर या ट्रोलर्सला कंटाळून राजीववर तो फोटो डिलीट करण्याची वेळ आली. राजीवने सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोवर यूजर्सकडून कमेंटसचा भडीमार होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहून महेश भट्ट यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण अशाप्रकारे महेश भट यांच्यासोबतचा एक फोटो रियाने याआधी शेअर केला होता.

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर २०२० हे वर्ष रियासाठी कठीण होते. गेल्या काही महिन्यापासून तिचा ड्रग्स प्रकरणानंतर ईडीच्या चौकशीपासून ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे तिचे आयुष्य अशा अनेक कारणांसाठी ती सतत चर्चेचा विषय होती. परंतु जुन्या साऱ्या गोष्टी विसरुन रिया पुन्हा आपले आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करत आहे.  तिच्या वर्कफ्रिंटबद्दल सांगायचे झाल्यास रिया ‘चेहरे’ या सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणर आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या सिनेमासाठी मोठमोठी बोली लावली आणि अखेर हॉटस्टारने बाजी मारली अशी चर्चा रंगत आहे.

- Advertisement -