घरमनोरंजनसोनाली कुलकर्णीचा ‘के सेरा’ मध्ये रॉकिंग लूक

सोनाली कुलकर्णीचा ‘के सेरा’ मध्ये रॉकिंग लूक

Subscribe

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या कूल भूमिकेतून माधुरी नावाचा मराठी चित्रपटातून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटात सोनालीसह शरद केळकर आणि संहिता जोशी यांची देखील प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते मोहसिन अख्तर आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. ‘के सेरा’ हे या गाण्याचे नाव असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा राँकिग लूक पाहायला मिळणार आहे. गायक स्वप्निल बांदोडकर, जान्हवी अरोरा आणि मुग्धा कर्‍हाडे या गाण्यासाठी एकत्र आले आणि या गाण्याला राँकिंग बनवले. वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून रॉकस्टार अवधूत गुप्ते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्यासाठी खास उर्मिला मातोंडकरने सोनाली कुलकर्णीची स्टायलिंग केली आहे. तसेच या गाण्याविषयी बोलताना उर्मिला मातोंडकरने म्हटले, जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की खरं तर हे गाणं प्रत्येक जनरेशनसाठी जणू आयुष्याचं अँथम आहे. ‘माधुरी’ हा चित्रपट येत्या 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -