Video : ‘या’ अभिनेत्रीला मराठी गायकाने केले प्रपोज व्हिडीओ व्हायरल

Mumbai

‘इंडियन आयडल पर्व ११’ वे खूप गाजत आहे. या शोमध्ये मराठमोळा रोहीत राऊत तगडा स्पर्धक आहे. गेले काही दिवस शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि नेहा कक्करमुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा झाली. नुकतच हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धक रोहित राऊतने अभिनेत्री दिशा पटाणीला प्रपोज केल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मलंग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री दिशा पटाणी आणि आदित्य रॉय कपूर, अनिल कपूरने नुकताच इंडियन आयडल पर्व ११मध्ये गेले होते. दरम्यान सगळेच स्पर्धक दिशाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. पण रोहित राऊतने थेट जाऊन दिशाला डान्स करण्यासाठी प्रपोज केले आहे.

 

तसेच तिला इंप्रेस करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या चढाओढीबद्दलही सांगतो. दिशा रोहितच्या बोलण्याने इंप्रेस होते आणि त्याच्यासोबत डान्स करण्यास होकार देते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहीत सुरी याने केलं आहे. ‘मलंग’ हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आगामी चित्रपट ‘मलंग’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटातील मुख्य पात्रचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. अभिनेता अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल केमू आणि अभिनेत्री दिशा पटानी या चित्रपटात मुख्य भूमिकेतून दिसणार आहे.