रोहित शेट्टीचा गोलमाल ‘अॅनिमेटेड’ रूपात

Mumbai

रोहित शेट्टी यांची लोकप्रिय गोलमाल फ्रँचाईझी लवकरच निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील वाहिनीवर अॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे. मॅजिक टून, रुद्रा यानंतर निकलोडियन या भारतीय मुलांच्या आवडत्या वाहिनीने त्यांचा भारतातच बनलेला धमाल शो सादर केला. निकलोडियनच्या आगामी कार्यक्रमांमध्ये गोलमाल ज्युनिअरची टीम दिसणार आहे. या वाहिनीने गोलमाल टीम अनिमेटेडमध्ये आणून विनोद, धमाल, मनोरंजक व हसवणारे अधिक चांगले, अधिक भव्य कार्यक्रम आणण्याचं आपलं वचन पाळलं आहे.

गोलमालच्या लोकप्रिय धमाल सिनेमांनी प्रौढांवर जादू केली आणि आता गोलमालची ज्युनिअर गँग लहान मुलांना हसवण्यास सज्ज आहे. गोलमाल ज्युनिअर दोन मस्तीखोर गँग्सना एकत्र आणणार आहे. या दोन्ही गँग्स खट्याळ आहेत, उत्साही आहेत पण एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. गोपाल, माधव, लक्ष्मण आणि लकी यांचे ज्युनिअर अवतार लहानग्यांना धमाल हसवण्यास सज्ज आहेत. ऐकूनच मस्त वाटतंय ना? सादर करत आहोत लक्ष्मण, गोपाल, माधव आणि लकीची प्रँक गँग गोलमाल ज्युनिअरमध्ये.

golmal animated

दिग्दर्शक रोहित शेट्टी याची गोलमालच्या सगळ्या भागांचा चाहता वर्ग आहे. लवकरच गोलमाल ५ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गोलमाल सिरीजचं अॅनिमेटेड रूप बघायला चाहते खूप उत्सुक आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here