घरताज्या घडामोडीएक एक सामान विकून १०० कुटुंबियांना रोनित करतोय मदत

एक एक सामान विकून १०० कुटुंबियांना रोनित करतोय मदत

Subscribe

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता रोनित रॉय एका व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याचा हा व्हिडिओ भारतातच नाहीतर अमेरिकेत तुफान व्हायरल होत होता. दरम्यान जानेवारी पासून त्याने एक पैसा कमावलेला नाही आणि त्याच्यावर १०० कुटुंबियांची जबाबदारी आहे. त्यामुळे तो सामना विकून त्यांना मदत करतोय, असा खुलासा एका मुलाखती मधून रोनितने केला आहे. रोनितने टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत त्याच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे.

इतकेच नाही तर त्यांने चॅनेल आणि निर्मात्यांना कलाकार आणि क्रू सदस्यांचे पगार देण्याबाबत सांगितलं आहे. रोनित रॉय ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘अदालत’ आणि ‘इतना करो न मुझे प्यार’ अशा मालिकेतून दिसला आहे.

- Advertisement -

रोनित या मुलाखतीत म्हणाला की, मी स्वतः जानेवारी महिन्यापासून एक पैसा कमावलेला नाही. माझे बरेच छोटे व्यवसाय सुरू होते. पण मार्चपासून ते बंद झाले आहेत. माझ्यावर १०० कुटुंबियांची जबाबदारी आहे. त्यामुळे मी एक एक सामान विकून त्यांची मदत करतोय.

पुढे तो म्हणाला की, मी फार श्रीमंत नाही, पण मला जेवढं होईल तेवढं मी करतोय. प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनलने थोडीफार तरी मदत करावी. शिवाय घरी बसलेल्या कलाकारांना, कर्मचाऱ्यांना प्रॉडक्शन कंपन्यांनी आर्थिक मदत करावी, अशी त्यांने या मुलाखतीत विनंती केली.

- Advertisement -

हेही वाचा – जॉर्ज फ्लॉइड यांची मुलगी म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी जग बदललं’; व्हिडिओ झाला व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -