Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Rowan Atkinsonने मिस्टर बीनला केले अलविदा

Rowan Atkinsonने मिस्टर बीनला केले अलविदा

रोवन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे आणि नाटकांमध्ये कामे केली आहेत. मात्र आजही त्यांना रोवन यांना मिस्टर बीन म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत.

Related Story

- Advertisement -

आपल्या पैकी मिस्टर बीन सगळ्यांनीच पाहिले आहे. मिस्टर बीन हे वेगळं आणि हटके पात्र असल्याने ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच आवडते. ही मिस्टर बीनची भूमिका साकारणारे ब्रिटिश अभिनेते म्हणजे रोवन एटकिंसन. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयातून प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन केले. रोवन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे आणि नाटकांमध्ये कामे केली आहेत. मात्र आजही त्यांना रोवन यांना मिस्टर बीन म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत. मात्र आता रोवन यांनी आपण पुन्हा मिस्टर बीन हे पात्र साकारणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्यांना हसवणार मिस्टर बीन हे पात्र आता नव्याने आपल्याला पाहता येणार नाहीय.

एका मुलाखतीत रोवन यांनी ते मिस्टर बीन हे पात्र साकारणार नसल्याचे सांगितले. असे असले तरी ते मिस्टर बीनच्या एनिमेटेड सिरिजमध्ये ते मिस्टर बीन या पात्राला आपला आवाज देणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. रोवन यांनी असे सांगितले आहे की, मिस्टर बीन या पात्राला फक्त आवाज देऊन मी हे पात्र निभावणार आहे. प्रत्यक्षात हे पात्र करण्यासाठी आता मला मजा येत नाही. हे पात्र साकारण्यासाठी अनेक जवाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात.

- Advertisement -

मिस्टर बीन हे पात्र खूप तणावपूर्व आणि धकवणारे पात्र आहे. ते करताना खूप मेहनत घ्यावी लागते. आता त्यांना हे पात्र संपवायचे आहे. १९९० साली टेलिव्हिजनवर मिस्टर बीन हे पात्र पहिल्यांदा दाखवले गेले. संपूर्ण जगात मिस्टर बीन हा शो प्रसिद्ध आहे. मिस्टर बीनच्या फेसबुक पेजवर जगभरात लोकांनी लाइक केलेल्या १० व्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – ऋतिक रोशनची ओटीटीवर एंट्री, जुनी मैत्रिण करतेय निर्मिती

- Advertisement -

 

- Advertisement -