Saaho Teaser: ‘साहो’चा थ्रिलर टिझर तुम्ही पाहिला का?

Mumbai

‘बाहूबली’चा सुपरस्टार अभिनेता प्रभास पुन्हा एकदा आपल्या ‘साहो’ चित्रपटाच्या निम्मिताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’चा नुकताच टिझर प्रदर्शित झाला आहे. अॅक्शन आणि भरपूर थ्रिलर असणारा या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा बाहूबली अभिनेता प्रभासच्या साहो चित्रपटाचा टिझर फक्त हिंदी भाषेतच नाही तर तमिळ आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. अॅक्शनने परिपुर्ण असणाऱ्या या चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर दिसणार आहे. साधारण १ मिनिटे ३९ सेकंद असणारा हा टिझर फुल ऑन अॅक्शनने भरलेला असून मंदिरा बेदी, नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे यांची पहली झलक दाखवण्यात आली आहे.

प्रभासचा साहो हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बाहुबली २ या चित्रपटानंतर प्रभासचा प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून, यामध्ये प्रभाससह श्रद्धा अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टिझरला सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळत असून हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here