घरमनोरंजनआता महागुरू म्हणणार,'लव्ह यू जिंदगी'!

आता महागुरू म्हणणार,’लव्ह यू जिंदगी’!

Subscribe

कोणी छोटासा आनंद शोधायला संपूर्ण आयुष्य घालवतो. तर काहीजण वय झाल्यावरही वय विसरून वागतात... इथूनच सुरू होतात गंमती-जमती...याच आशयाची कथा आगामी मराठी सिनेमा 'लव्ह यू जिंदगी' मधून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं आहे.

प्रत्येक व्यक्तीचा आनंद शोधण्याचा मार्ग हा वेगवेगळा असतो. कोणी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतो. तर कोणी छोटासा आनंद शोधायला संपूर्ण आयुष्य घालवतो. तर काहीजण वय झाल्यावरही वय विसरून वागतात… इथूनच सुरू होतात गंमती-जमती…याच आशयाची कथा आगामी मराठी सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’ मधून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं आहे.

New Movie
सचिन पिळगावकरांचा नवीन चित्रपट

काय आहे पोस्टरमध्ये

‘लव्ह यू जिंदगी’ या चित्रपटात सचिन पिळगावर आहेत. त्यांची अगदी सामान्य गृहस्थाची भूमिका असल्याचं त्यांच्या एकूण लुकवरून समजतंय. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी अनिरूध्द दाते यांची भूमिका साकारली आहे. अनिरूध्द दाते यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गंमतीजमती या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे म्हणजे एस. पी. प्रोडक्शन्सने केली आहे. तर मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे. वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट १४ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -