Sacred games 2 : जुना खेळ, नवे गडी!

अपेक्षेप्रमाणेच सिजन २ ची दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या सिजनमध्ये काही कलाकारांची एन्ट्री होऊन एक्झिट झाली होती. तसेच काही आणखी नवे चेहरे दुसऱ्या सिजनमध्ये पाहायला मिळत आहेत.

Mumbai
Sacred Games 2
सेक्रेड गेम्स २

अखेर सेक्रेड गेम्स वेबसीरिजचा दुसरा भाग आज, १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शीत झाला आहे. नेटफ्लिक्सवरील ही लोकप्रिय सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ती आता संपली आहे. अपेक्षेप्रमाणेच सिजन २ ची दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या सिजनमध्ये काही कलाकारांची एन्ट्री होऊन एक्झिट झाली होती. तसेच काही आणखी नवे चेहरे दुसऱ्या सिजनमध्ये पाहायला मिळत आहेत. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मराठीतील कसदार अभिनेत्री अमृता सुभाष ही कुसुम देवी यादव या अधिकारीच्या भूमिकेत पाहायला मिळत असून रात्रीस खेळ चाले फेम दत्ता हा मराठमोठा अभिनेता सुहास शिरसाठदेखील कांबळे या पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तर सरताजची सोडून गेलेली पत्नी मेघा हिची भूमिका अनुप्रिया गोयनका हिने साकारली आहे. त्यामुळे गणेश गायतोंडेच्या जुन्या खेळातील हे नवे गडी सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागात रंगत आणत आहेत.

‘सेक्रेड गेम्स २’ या दुसऱ्या सिझनाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. पहिल्या सिजनमध्ये मराठी अभिनेत्री राधिका आपटे रॉ एजंटची व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. तर दुसऱ्या सिजनमध्ये देखील चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. मराठी ते हिंदी चित्रपटापर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री अमृता सुभाष ही ‘सेक्रेड गेम २’ मध्ये केडी यादव ही व्यक्तिरेखा साकारत आहे. श्वास, किल्ला, बालक पालक, रमन राघव, गल्ली बॉय या सुप्रसिद्ध चित्रपटातून अमृता सुभाषने आपले अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. ‘सेक्रेड गेम २’ मध्ये अमृता सुभाष ही एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे.

बिग बॉस मराठी २ मधील स्पर्ध अभिनेत्री नेहा शितोळे सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिजनमध्ये हवालदार काटेकरच्या पत्नीची भूमिका नेहाने साकारली होती. तर या सिरिजच्या दुसऱ्या सिजनमध्येही नेहा शालिनी काटेकरच्या भूमिकेत दिसत आहे. त्यासाठी सोशल मीडियावरूनही नेहा शुभेच्छा दिल्या जात आहेत. ट्विटरवर हॅशटॅग नेहा विनिंग हार्ट्स हे ट्रेडिंग पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

‘सेक्रेड गेम्स २’ साठी नवाजुद्दीने घेतले ‘एवढे’ मानधन!

Sacred Games 2 मध्ये तीन नवीन टर्निंग पॉईट