‘सेक्रेड गेम्स २’ साठी नवाजुद्दीने घेतले ‘एवढे’ मानधन!

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सिझनमधून सैफ अली खान,नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांच्या वेगळ्या भुमिका आहेत. नवाजुद्दीने या दुसऱ्या सिझनसाठी दुप्पट मानधन घेतल्याची सध्या चर्चा आहे.

Mumbai
nawazuddin
नवाजुद्दीन

सध्या सगळ्या नेटसॅव्हींची आवडती वेबसिरीज म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स’. सगळ्यांच्या तोंडी कायम‘सेक्रेड गेम्स’ची चर्चाच असते. या वेबसिरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नुकतीच सीरीजच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

sacred games
सेक्रेड गेम्स

या वेबसिरीजच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार एकत्र येणार आहेत. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांची वेगळी रूप प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘सेक्रेड गेम्स’मधील अनेक पात्र यशस्वी झाले. त्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यातीलच एक विशेष गाजलेलं पात्र म्हणजे ‘गणेश गायतोंडे’. गणेश गायतोंडे हे पात्र साकारलं होतं नवाजुद्दीन सिद्दीकीने. नवाजने साकारलेल्या गायतोंडेमुळे त्यांनी प्रेक्षकांना आपलसं केलं.

मानधानात झाली वाढ

‘गणेश गायतोंडे’ या पात्र गाजल्यामुळे सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने मानधान वाढवून घेतल्याची चर्चा आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ ने दिलेल्या बातमीनुसार पहिल्या भागासाठी सैफ अली खान आणि नवाज या दोघांनाही समान मानधन देण्यात आलं होतं. पण आता दुसऱ्या भागासाठी नवाजने पहिल्या भागाच्या दुप्पट आकडा मानधन घेतलं आहे. नवाजच्या भूमिकेची लोकांवर असलेली जादू बघता, निर्मात्यांनीही लगेच नवाजची अट मान्य केली आहे.